Ranveer Singh : रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी.! तो एक निर्णय पडला चांगलाच महागात, नेमकं काय घडलं? पाहा….
या वादाचा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या एका मोठ्या वादामुळे चर्चेत आला आहे. दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या बहुप्रतिक्षित डॉन 3 या चित्रपटातून रणवीर सिंहने अचानक माघार घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या चित्रपटसृष्टीतील कामगार संघटनेने रणवीर सिंहविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे वृत्त समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शूटिंगला अवघे काही आठवडे शिल्लक असताना रणवीर सिंहने अचानक ‘डॉन 3’ (Don3) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे निर्मात्यांना मोठ्या आर्थिक आणि नियोजनाच्या अडचणींना सामोरे जावे लागल्याचे सांगितले जात आहे. (Ranveer Singh)
एफडब्ल्यूआयसीईचे मुख्य सल्लागार आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात ११ एप्रिल रोजी झाली. निर्माते फरहान अख्तर यांनी रणवीर सिंहविरोधात अधिकृत तक्रार दाखल केल्याचेही सांगितले जात आहे.
चित्रपटाचे शूटिंग परदेशात होणार होते आणि संपूर्ण युनिट रवाना होण्यासाठी तयारी पूर्ण झाली होती. अशातच मुख्य अभिनेत्याने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे निर्मात्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. (Ranveer Singh)
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या Excel Entertainment या प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर मोठा खर्च केला होता. रणवीरच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे निर्मात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, हा वाद मिटवण्यासाठी प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र दोन्ही बाजूंमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर अनेक बैठका झाल्यानंतर कामगार संघटनेने रणवीर सिंहविरोधात कठोर भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रणवीर सिंहच्या करिअरवर परिणाम? (Ranveer Singh)
‘पद्मावत, सिम्बा, बाजीराव मस्तानी, गली बॉय आणि गोलियों की रासलीला राम-लीला’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे रणवीर सिंहने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या वादाचा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.






