Vinay Kulkarni : कॉंग्रेस नेते विनय कुलकर्णी अपात्र; हत्या प्रकरणी शिक्षा झाल्याने कारवाई
कर्नाटकमधील सत्ताधारी कॉंग्रेसचे नेते विनय कुलकर्णी (Vinay Kulkarni) यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्याने ती कारवाई करण्यात आली.

Vinay Kulkarni : कर्नाटकमधील सत्ताधारी कॉंग्रेसचे नेते विनय कुलकर्णी (Vinay Kulkarni) यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्याने ती कारवाई करण्यात आली.
त्यामुळे कर्नाटक विधानसभेची एक जागा आता रिक्त झाली आहे. आधी जन्मठेप आणि आता आमदारकी रद्द झाल्याने माजी मंत्री असणाऱ्या ५७ वर्षीय कुलकर्णी यांना दुहेरी हादरा बसला.
भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्या प्रकरणामुळे ते (Vinay Kulkarni) अडचणीत आले. गौडा यांची धारवाडमध्ये काही हल्लेखोरांनी जून २०१६ मध्ये हत्या केली.
त्यावेळी मंत्री असणारे कुलकर्णी हत्येमागे असल्याचा आरोप करण्यात आला. त्या हत्या प्रकरणाचा तपास वर्ष २०१९ मध्ये तत्कालीन भाजप सरकारने सीबीआयकडे सोपवला.
तपासानंतर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. त्या प्रकरणी विशेष न्यायालयाने कुलकर्णी यांना नुकतेच दोषी ठरवले. त्यांना १७ एप्रिलला शिक्षा ठोठावण्यात आली. सध्या ते तुरूंगात आहेत. जन्मठेप ठोठावण्यात आल्याने त्यांना आमदारकी गमवावी लागली आहे.
त्यांना आमदार (Vinay Kulkarni) म्हणून अपात्र ठरवण्यात आल्याची अधिसूचना शनिवारी कर्नाटक विधानसभेने जारी केली. कुलकर्णी यांच्याशी संबंधित घडामोडी कॉंग्रेसची राजकीय कोंडी करणाऱ्या ठरल्या आहेत.






