Cricketer Death : क्रिकेट विश्वावर शोककळा! ‘या’ खेळाडूचे 39 व्या वर्षी निधन
कर्नाटकचा माजी वेगवान गोलंदाज एस. एल. अक्षय यांचे रविवारी एका क्लब मॅचदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (हार्ट अटॅक) दुर्दैवी निधन (Cricketer Death) झाले.

Cricketer Death : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचा माजी वेगवान गोलंदाज एस. एल. अक्षय यांचे रविवारी एका क्लब मॅचदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (हार्ट अटॅक) दुर्दैवी निधन (Cricketer Death) झाले. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय बंगळूरु येथे आयोजित ‘केएससीए थर्ड डिव्हिजन लीग’च्या एका सामन्यात सफायर सीसी संघाकडून खेळत होते. मैदानावर नेहमीप्रमाणे उत्साहात उतरलेल्या अक्षय यांनी सामन्यादरम्यान आपल्या कोट्यातील चार ओव्हर्स गोलंदाजी देखील केली. मात्र, षटक पूर्ण केल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या.
प्रकृती बिघडत चालल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, मैदानाबाहेर येताच त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत (Cricketer Death) मालवली.
एस. एल. अक्षय हे कर्नाटकच्या देशांतर्गत क्रिकेट वर्तुळातील एक परिचित नाव होते. २०१४-१५ च्या ऐतिहासिक हंगामात रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावणाऱ्या बलाढ्य कर्नाटक संघाचा ते एक महत्त्वाचा भाग होते. आपल्या धारदार आणि वेगवान गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
अक्षय यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा आलेख पाहिला तर, त्यांनी २०११ ते २०१३ या काळात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना ६ प्रथम-श्रेणी सामने, ३ लिस्ट-ए सामने आणि ९ टी-२० सामने खेळले होते. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी १८ विकेट्स घेत ८९ धावा केल्या होत्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ६ विकेट्स आणि टी-२० फॉरमॅटमध्ये ८ बळींची नोंद आहे.
अक्षय यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची कारकीर्द जरी अल्पकाळ टिकली असली, तरी क्रिकेटबद्दलची त्यांची आवड आणि निष्ठा कधीही कमी झाली नाही. व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही ते मैदानाशी आणि खेळाशी सातत्याने जोडलेले राहिले.
तरुण खेळाडूंना घडवण्यासाठी त्यांनी आपले योगदान देण्यास सुरुवात केली होती. नुकतेच ते कर्नाटकच्या १९ वर्षांखालील (Under-19) संघासोबत जोडले गेले होते आणि युवा खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत होते.
अक्षय यांच्या या आकस्मिक आणि धक्कादायक निधनानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (KSCA) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संघटनेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “अक्षय यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांमधून कर्नाटक क्रिकेटची उत्कृष्ट सेवा केली.
युवा क्रिकेटपटूंच्या जडणघडणीत त्यांनी बजावलेली भूमिका नेहमीच स्मरणात (Cricketer Death) राहील.” अक्षय यांच्या जाण्याने कर्नाटक क्रिकेटची अपूरणीय हानी झाली असून, सोशल मीडियावर अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.






