Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! ‘या’ 3 माजी खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश
पश्चिम बंगालमधील राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना (Political News) प्रचंड वेग आला आहे. तृणमूल काँग्रेसला मोठा खिंडार पाडत पक्षाच्या तीन माजी खासदारांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Political News : पश्चिम बंगालमधील राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना (Political News) प्रचंड वेग आला आहे. तृणमूल काँग्रेसला मोठा खिंडार पाडत पक्षाच्या तीन माजी खासदारांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सुष्मिता देव, सुखेंदु शेखर रॉय आणि प्रकाश बारिक अशी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते शमिक भट्टाचार्य यांनी या तिन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाची (Political News) अधिकृत घोषणा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप या तिघांनाही आगामी निवडणुकीत राज्यसभेवर पाठवण्याची दाट शक्यता आहे.
या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२६ आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या बंडखोरीमुळे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये (Political News) मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.






