Sanjay Raut : ‘लॅाटरी’वरून राजकारण रंगलं…! राऊतांनी शिंदेंना काढला चिमटा; अमित शाह यांना म्हणाले…

Sanjay Raut : नुकतीच वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॅाटरी लागल्याचे विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानानंतर राज्याचे राजकारण रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या या विधानावरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांंनी त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लक्ष्य केलं आहे.
वास्तविक ‘लॉटरी’ हा प्रतिष्ठित शब्द आहे. एकेकाळी सरकारदेखील लॉटरी चालवत होते. पण आता राज्यात बेकायदा मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही आकडा लावला जात आहे, असा दावा राऊतांनी केला आहे. पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असावा. मुख्यमंत्रिपदासाठी मटका लागला असावा, असे त्यांना म्हणायचे असावे असा चिमटा राऊतांनी नाईक यांनी केलेल्या विधानावर काढला.
त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसला आहे.
मटक्याचे आकडे चंचल असतात. सकाळ, दुपार आणि रात्री असे वेगवेगळे आकडे निघतात. हे आकडे सांभाळता येत नाहीत आणि त्यातही यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसला आहे. ते तिथे जाऊन आकडा लावण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या यांचा आकडा लागत नाही, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
राऊतांचा दावा
राऊत यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि त्यांच्या व्यापाऱ्यांचे मुंबई ताब्यात घेण्याचे लक्ष्य आहे, असा दावा करत ही मुंबई गुजरातींच्या हाती जाऊ न देण्याचे शिवसेना (उबाठा) व मनसेचे लक्ष्य आहे. मुंबई ही मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
हेही वाचा : Pimpri News | अनुदानाशिवायचा आदर्श! जयगड सोसायटीने उभारला देशातील मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प





