पुणे अपघात प्रकरणात राजकीय दबाव; मृतांचा व्हिसेरा रिपोटही बदलणार असल्याचा अनिल देशमुखांचा आरोप

Pune Porsche Car Accident | पुण्यातील कल्याणीनगर अपघाताप्रकरणी चौकशी सुरू असून सातत्याने याबाबत नवे खुलासे होत आहे. यातच आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रकरणावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
अनिल देशमुख यांनी गुरुवारी एक ट्विट करत म्हटले आहे की, “पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारु न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.”
पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 13, 2024
“जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण-तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सुरू आहेत,” असा धक्कादायक आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. Pune Porsche Car Accident |
दरम्यान, कल्याणी नगर परिसरात बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून दोघांना उडवले होते. यात एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुधवारी बालन्याय हक्क मंडळात झालेल्या सुनावणीत 25 जुनपर्यंत अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहे. Pune Porsche Car Accident |
या प्रकरणात कोणाला अटक?
अपघातानंतर याप्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणारे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल, आई शिवानी, आजोबा सुरेंद्र, तसेच ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, पबमध्ये मुलांना मद्य विक्री करणारे पबमालक, कर्मचाऱ्यांना अटक केली.
मात्र सध्या अनिल देशमुख यांच्या पोस्टमुळे राजकारण तापले आहे. त्यांनी नक्की कोणत्या राजकीय नेत्याकडे बोट दाखवले आहे, याची चर्चा आता सुरु झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची पोस्ट चर्चेचा विषय झाली आहे.
हेही वाचा :





