Political News: “दंगली करून राजकीय फायदा घेणे हा भाजपसमोरचा पर्याय” ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
Political News: राज्यात तसेच देशात भाजपविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला असून, त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे,

Political News: राज्यात तसेच देशात भाजपविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला असून, त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. युवक आणि शेतकरी वर्ग भाजपच्या विरोधात गेल्याने आता दंगली घडवून आणणे आणि त्याचा राजकीय फायदा करून घेणे, हा भाजपसमोरचा पर्याय उरला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. (Political News)
राज ठाकरे जे म्हणत आहेत, त्यामध्ये तथ्य असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सरकारचा पाया दोन धर्मांमध्ये भांडण लावून मत मिळवणे आणि देशात अशांतता निर्माण करणे, एवढाच असल्याची टीकाही त्यांनी केली. (Political News)
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थितीबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी काही भागांत ‘येलो मॅजिक’चा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले. आता पाऊस झाला नाही, तर कपाशीचे संपूर्ण पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.(Political News)

Political News: “दंगली करून राजकीय फायदा घेणे हा भाजपसमोरचा पर्याय” ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
सरकारने जलसंधारणासह विविध योजनांवर मोठा खर्च केला. मात्र, प्रत्यक्षात पाणी साठवणूक आणि उपलब्धतेच्या बाबतीत परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. “पाणी पुरवले, पैसे जिरवले; मात्र हे सर्व काम कागदावरच राहिले,” अशी टीका त्यांनी केली.
यासाठी नैसर्गिक पावसाची आवश्यकता असून अमरावती जिल्ह्यातही पावसाची मोठी टंचाई निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. विहिरी, तलाव आणि धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. हे संकट आणखी गंभीर होण्यापूर्वी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, एका प्रश्नाला उत्तर देताना “मला याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीशी संबंधित निर्णयाबाबत विचारले असता, दिल्लीतील इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्रितपणे याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.





