गौतमी पाटीलच्या कार अपघात प्रकरणावरून राजकीय वादंग; रिक्षाचालक कुटुंबाचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

पुणे – लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने वडगाव बुद्रुक परिसरात एका रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी वादंग निर्माण झाला आहे. अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, घटनेनंतर राजकीय स्तरावर चांगलाच संघर्ष पेटला आहे.
३० सप्टेंबरच्या पहाटे नवले पुलाजवळ घडलेल्या या अपघातानंतर गौतमी पाटीलला जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अपघातावेळी वाहनात ती होती का, याची चौकशी सुरू असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती आले आहे. वाहन चालक संतोष उभे असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्याचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.
चंद्रकांत पाटील यांचा पोलिसांना फोन, रोहित पवार यांची टीका
या घटनेत राजकीय रंग चढला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहर पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांना फोन करून “दोषींवर कडक कारवाई करावी” असे सांगितले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली.
माननीय चंद्रकांतदादा पाटील,
तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही.
गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची… pic.twitter.com/eboE6Iqixc— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2025
रोहित पवार म्हणाले, “तुमच्या मतदारसंघातील नामचीन गुंड परदेशात पळून गेला, त्यावेळी तुम्ही पोलिसांना फोन केला नाही. पण गौतमी पाटील गाडीत नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणे हे मंत्रीपदाला शोभणारे नाही. दोषी कोण असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे.” रोहित पवार यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. Gautami Patil |
यावर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील भाजप मेळाव्यात उत्तर देताना, “कायदा आपलं काम करतोय, दोषींना वाचवण्याचा प्रश्नच नाही” असे प्रतिपादन केले. Gautami Patil |
हेही वाचा:
Shirur News : टाकळी हाजी आरोग्य केंद्र प्रकरण : तिसऱ्यांदा दाखल झाली चौकशी समिती





