भरतपूर – राजस्थान मधील भरतपूर येथे दिवसाढवळ्या एका डॉक्टर दांम्पत्याचा गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार शहरातील हिरदास बस स्थानकाजवळी भर चौकात घडला असून दुचाकीवरुन दोघांनी येऊन डॉक्टर दांम्पत्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली व आरोपी फरार झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 4.45 वाजता घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
दुचाकीवरील या दोघांनी सुरुवातीला या दांम्पत्यास एका क्रांसिंगवर ओवरटेक केेले. त्यांनतर पायी चालत ते डॉक्टर दांम्पत्याजवळ आले. कारमधील डॉक्टरच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कारचा दरवाजा बंद करण्याचा प्रर्यंत केला मात्र तेवढ्यातच या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला व घटनास्थळावरुन पळ काढला.
हे ही वाचा
— नागपुरात चार दिवसांपूर्वी झाला होता बाप-लेकाचा बुडून मृत्यू; घटनेचा व्हिडीओ आला समोर
— थरकाप उडवणारा व्हिडीओ ! चेकपोस्टवरील अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
— दादर रेल्वेस्टेशनवरील थरार CCTVत कैद! महिला आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली,…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हा खून बदलेच्या भावनेतून झाला असावा. हे दांम्पत्य एका युवतीच्या हत्येमध्ये सहभागी होते. याचा संबध डॉक्टर सोबत होता. गोळीबार करणारा आरोपी हा त्या महिलेचा भाऊ असल्याची पोलिसांना ओळख पटली आहे. या महिलेची हत्या दोन वर्षापुर्वी झाली असून यामध्ये डॉक्टरची पत्नी व आई ह्या आरोपी आहेत.
A doctor couple shot dead in broad daylight in Rajasthan. Such an absolute state of lawlessness in Rajasthan is due to a spineless state govt. that has done nothing to stop criminals who run amok in our cities & villages. pic.twitter.com/Ru0zKYgf2C
— Col Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) May 28, 2021
भाजप नेते राज्यवर्धन राठोड यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करुन अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. ते म्हणाले की, “राजस्थानात एका डॉक्टर दांपत्याला गोळ्या घालून ठार मारले गेले. राजस्थानमध्ये अशाप्रकारची बेभानपणाची स्थिती राज्य सरकारच्या अखत्यारीतून आली आहे. आमच्या शहरांमध्ये व खेड्यात शांतता करण्यासाठी व गुन्हेगारांना रोखण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही.”