मुंबई – सध्या करोना विषाणूने गंभीर रूप धारण केलं आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा मराठी कॉमेडी अभिनेता ‘भूषण कडू’ यांच्या पत्नीचे करोनामुळे निधन झालं आहे.
View this post on Instagram
पत्नी कादंबरी कडू यांच्या जाण्याने भूषणवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी कादंबरीला करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु करोनासोबत लढाई करण्यास त्या अयशस्वी ठरल्या. कादंबरीने वयाच्या 39 व्या वर्षी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.
View this post on Instagram
भूषण कडू यांना 7 वर्षाचा मुलगा आहे. आई कादंबरीच्या अचानक जाण्याचं कडू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कादंबरी या भूषण कडू यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. प्रकिर्थ कडू असं त्यांच्या मुलाचं नाव आहे.
View this post on Instagram