Pune News : पोलीस मित्र संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे : महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचा ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष राजेंद्र कपोते मा. आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी चेतन अगरवाल, अजीज सय्यद, मनीष सोनिगरा, सचिन काळे, पि. एम. टी. चे मा. अध्यक्ष चंद्रशेखर कपोते, अपूर्व खाडे, चैतन्य जगताप, बॉबी कर्नानी, रोहिणी भोसले, गौरी गद्रे इत्यादी उपस्थित होते.
या वेळी विमल काळभोर, सुनंदा काळे, रेश्मा वेडे पाटील, महावीर पाटील, संजय मोरे, रमेश सोनावणे, रितेश इनानी, विजय कुमार जाधव, भाग्यश्री म्हस्के, प्रियंका कोटमकर इत्यादीनचा स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मोहन जोशिंनी आपल्या भाषणात संघटनेचे कार्याचे कौवतुक करून पोलिसांचे प्रशन संघटने द्वारे राज्य शासना कडे सातत्याने मांडले जात असून प्रत्येक सण, गणेश उत्सव इत्यादी धार्मिक कार्यक्रमाच्या संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांना बंदोबसतात सहकार्य करीत असल्याचे सांगितले.
राजेंद्र कपोते यांनी आपल्या भाषणात राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच संघटने मुळे अनेक तरुण पोलीस खात्यात सेवा करण्यास प्रभावित होत असून आत्ता पर्यंत अनेक जण पोलीस खात्यात काम करीत असून अनेक जण वरिष्ठ पदापर्यंत गेलेले आहेत. कार्यक्रमाची सुरवात गणेश वंदनेने झाली सूत्र संचारण संदीप साकोरे यांनी केले. शाम सीसोदे यांनी देश भक्ती वर गिते सादर केली.
या वेळी योगेश आचार्य, चैतन्य जगताप, दत्ता दाखले, सीताराम जगताप, दीपक जोशी, सारिका मरचंट, ललित लांडे, अमित सातकर, प्रणव बुरडे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येयेने उपस्थित होते.





