Video : “जेवणात विष मिसळले.. नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलाय…”; तनुश्री दत्ताचे पुन्हा खळबळजनक आरोप

Tanushree Dutta । Nana Patekar : अभिनेत्री तनुश्री दत्तानं 2008 मध्ये नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात एका डान्स सिक्वेन्स दरम्यान लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात तनुश्रीने एफआयआर दाखल केली होती.
त्यानंतर याप्रकरणी तिने नाना पाटकरांसह इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी कोर्टात विनयभंग आणि धमकीची तक्रार दाखल केली होती आणि याचिकाही दाखल केली. मात्र त्यानंतर नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी दिलासा मिळाला. हे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याने दंडाधिकारी कार्यालयाने बी समरी रिपोर्ट फेटाळून लावला होता.
दरम्यान, आता पुन्हा एकदा या अभिनेत्री अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. नुकतंच अभिनेत्री तनुश्री दत्तानं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यामध्ये ती रडत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तिने तिच्यासोबत घडत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
या व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. तसेच घरात मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. आणि या व्हिडीओमागील सत्य सांगत आता तिने थेट याबद्दल नाना पाटेकरांना जबाबदार धरलं आहे. या संपूर्ण व्हिडीओमध्ये तनुश्रीने कोणाचेही नाव घेतलेलं नव्हतं. पण काही प्रसिद्ध वृत्तवाहिनींशी बोलताना तनुश्रीने नाना पाटेकरांच स्पष्ट नाव घेऊन अनेक आरोप केले आहेत.
ती म्हणाली “माझ्यासोबत या 4 ते 5 वर्षांपासून फार काही विचित्र घटना घडत आहेत. माझ्या कारचा ब्रेक काढून टाकला होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा पाठलाग केला गेला जात आहे. मी जिथेही जायचे तिथे माझा पाठलाग करणारे लोक मला दिसायचे. मी साईन केलेले प्रोजेक्ट माझ्याकडून काढून घेण्यात आले. मला हा त्रास देण्यात नाना पाटेकरांचा हात आहे.” असं तिने गंभीर आरोप केला आहे.
एवढंच नाही तर तिने सुशांतसिंग राजपूतसोबत जे केलं तेच माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही तिने म्हटलं तसेच तनुश्रीने अजून एक गंभीर आरोप केला आहे, जेवणात विष मिसळून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचं ती सांगते. ती म्हणाली “माझा पाठलाग करण्यासाठी जी माणसं लावली आहेत त्यात नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील नाना पाटेकरांचे कोणी साथी असतील तर त्यांचाही सहभाग आहे.
मला त्याच्यावरच हा संशय आहे. मी ज्या हॉटेलमध्ये राहायचे तिथे विचित्र माणसे माझ्या रुमचे दार वाजवून मला त्रास द्यायचे. अनेकदा माझ्या जेवणात विष मिसळून मला आजारी पाडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला पण मी वाचले.” असं सुद्धा तिने यावेळी सांगितलं होत.
View this post on Instagram
कोण आहे तनुश्री दत्ता?
तनुश्री दत्ता ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 2004 मध्ये ‘मिस इंडिया’ स्पर्धा जिंकली होती. तनुश्री दत्ताचा जन्म 19 मार्च 1984 रोजी झाला. तिने कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे. 2005 मध्ये तिने ‘Sssshhh…’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
2018 मध्ये, तिने #MeToo चळवळीमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती. 2018 मध्ये, तनुश्री दत्ताने #MeToo चळवळीमध्ये अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. तिने नाना पाटेकर यांच्यासह अनेक जणांवर आरोप केले आणि या आरोपांमुळे बराच वाद निर्माण झाला.
कोर्टाच्या निकालानंतर तनुश्रीने काय सांगितलं….
कोर्टाच्या निकालानंतर तनुश्रीने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली होती. तसेच याचिका कोर्टाने रद्द केली नसल्याचा दावा केला आहे. तनुश्रीने म्हटलं आहे “कृपया कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, फसव्या आणि बदनामीकारक बी सारांश अहवाल न्यायालयाने फेटाळला आहे. माझ्या लैंगिक छळाचे प्रकरण नाही. 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी दाखल केलेला बी सारांश अहवाल न्यायालयीन युक्तिवाद आणि खटल्यांच्या अनेक महिन्यांनंतर काल न्यायालयाने नाकारला. म्हणजे मुळात नाना पाटेकर यांच्यावरील लैंगिक छळाचे प्रकरण अद्याप सुरु आहे.
दरवर्षी नानांची पीआर टीम केस बंद झाल्याबद्दल अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवते आणि हा देखील तोच प्रकार करण्यात आला आहे. ते कोर्टात हे प्रकरण हरले म्हणून चुकीची माहिती पसरवण्याचा आणि मीडियाला गॅसलाइट करण्याचा प्रयत्न करत आहेत. कृपया पॅथॉलॉजिकल लबाड आणि त्याच्या पीआर टीमवर विश्वास ठेवू नका,” अशी विनंती तनुश्रीने केली आहे.
बी सारांश हा खटला बंद करण्याचा एक कमकुवत प्रयत्न होता पण माझ्या कायदेशीर टीमने त्या गोष्टीला बरोबर हाताळलं आहे आणि हा युक्तिवाद जिंकला आहे. हा आमचा एक छोटासा विजय होता पण या निकालाने नानांचा आत्मा जळत आहे म्हणूनच अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवली जात आहे.
मिडीयाच्या खोट्या बातम्या तयार करण्यासाठी भरपूर पैसा लावला जात आहे. त्यांच्यावरील खटला बंद झालेला नाही. कृपया तथ्य तपासा” असं म्हणत तनुश्रीने कोर्टाची तथ्ये तपासून घेण्याची विनंती केली आहे. याद्वारे तिने नाना पाटेकरांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं तिने यावेळी सांगितलं.





