कोण आहेत महंत बाबूसिंग महाराज राठोड?
Updated On:

वाशिम : आज राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या आमदारांचा शपथविधी आज पार पडला. या 7 आमदारांपैकी एका नावाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये भाजपने राज्यपाल नियुक्त 7 आमदारांमध्ये बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिममधील पोहरादेवी शक्ती पीठाचे महंत बाबुसिंग महाराज यांचाही समावेश आहे.
कोण आहेत महंत बाबुसिंग महाराज ?
महंत बाबुसिंग महाराज राठोड हे पोहरादेवी मठाचे पीठाधिश आहेत. ६३ वर्षीय बाबुसिंग महाराज यांनी बीए पर्यंत शिक्षण घेतलं आहे. महंत डॉ रामराव महाराज यांच्या समाधी नंतर त्यांची पोहरादेवी शक्ती पिठाचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर रोजी नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पणा वेळी महंत पिठाधिश बाबुसिंग महाराजांची भेट घेतली होती.





