फक्त 7999 रुपयात लाँच झाला 5G स्मार्टफोन, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त

POCO C75 5G Smartphone Launched: POCO ने भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स POCO M7 Pro आणि POCO C75 5G ला लाँच केले आहे. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सला खूपच कमी किंमतीत लाँच केले आहे. M7 Pro मध्ये gOLED डिस्प्ले, 50MP चा रियर कॅमेरा आणि 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर POCO C75 5G मध्ये 5160mAh ची बॅटरी, 50MP चा रियर कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसर मिळेल. पोकोच्या या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
POCO M7 Pro आणि POCO C75 5G ची किंमत
POCO M7 Pro स्मार्टफोन दोन कॉन्फिग्रेशनसह येतो. याच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. या फोनला तुम्ही लॅव्हँडर फ्रॉस्ट, लूनर डस्ट आणि ऑलिव्ह ट्विटलाइट या रंगात खरेदी करू शकता.
POCO C75 5G फोन केवळ 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. या फोनची किंमत फक्त 7,999 रुपये असून, डिव्हाइसला ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. POCO C75 5G ला 19 डिसेंबर आणि POCO M7 Pro ला 20 डिसेंबरपासून खरेदी करता येईल.
POCO M7 Pro आणि POCO C75 5G चे स्पेसिफिकेशन्स
POCO M7 Pro मध्ये 6.67-inch चा FHD+ gOLED डिस्प्ले देण्यात आला असून, यात 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळेल. स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass 5 देण्यात आले आहे. हा फोन MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसरसह येतो.
फोन 8जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. हा फोन अँड्राइड 14 वर आधारित HyperOS वर काम करतो. यात फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल रियर देण्यात आले आहे. तर फ्रंटला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. डिव्हाइसमध्ये 45वॉट चार्जिंग सपोर्टसह 5110mAh बॅटरी देण्यात आली आहे.
तर POCO C75 5G मध्ये 6.88-inch चा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. हा फोन जिओ 5G सपोर्टसह येतो. डिव्हाइस अँड्राइड 14 वर आधारित HyperOS वर काम करतो.
पोकोच्या या फोनमध्ये 50 मेगापिक्सलसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर व्हीडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5160mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळेल.





