दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा, पोकोने लाँच केला खूपच स्वस्त स्मार्टफोन; किंमत फक्त…

POCO C71 Price – Features | पोकोने भारतीय बाजारात आपला नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन POCO C71 लाँच केला आहे. आकर्षक डिझाइन आणि दमदार फीचर्स असलेला हा फोन खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटची स्क्रीन आणि IP52 रेटिंग यासारखे वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. हा स्मार्टफोन 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. POCO C71 ची किंमत आणि खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
POCO C71 चे स्पेसिफिकेशन्स
POCO C71 मध्ये 6.88-इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे, जो HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 600 Nits ची पीक ब्राइटनेस मिळते. हा स्मार्टफोन Unisoc T7250 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये 4GB RAM आणि 6GB RAM चा पर्याय उपलब्ध आहे. फोन 64GB आणि 128GB स्टोरेजच्या पर्यायांमध्ये येतो.
फोटोग्राफीसाठी POCO च्या या स्मार्टफोनमध्ये 32MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, फ्रंटला कंपनीने 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 5200mAh ची बॅटरी दिली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. मात्र, बॉक्समध्ये 15W चा चार्जर मिळतो.
POCO C71 स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर काम करतो. यात सुरक्षेसाठी POCO C71 मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
POCO C71 ची किंमत
POCO C71 ला कंपनीने दोन स्टोरेज व्हेरिएंट आणि तीन रंगात लाँच केले आहे. या फोनला डेझर्ट गोल्ड, कूल ब्लू आणि पॉवर ब्लॅक रंगात खरेदी करू शकता. फोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये, तर 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. हा फोन 8 एप्रिलपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. एअरटेल युजर्ससाठी कंपनी खास ऑफर देत ग्राहक ऑफऱ अंतर्गत फोनला 5,999 रुपयात खरेदी करू शकतात.





