Poco च्या दोन दमदार स्मार्टफोन्सची बाजारात एन्ट्री, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त; पाहा डिटेल्स

Poco ने जागतिक बाजारात दोन नवीन स्मार्टफोन्स Poco F7 Ultra आणि Poco F7 Pro ला लाँच केले आहे. दोन्ही डिव्हाइसला प्रीमियम स्पेसिफिकेशन्स आणि दमदार परफॉर्मन्ससह सादर करण्यात आले आहे. Poco F7 Pro मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आणि Poco F7 Ultra मध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे. या दोन्ही फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Poco F7 Ultra आणि Poco F7 Pro ची किंमत
प्रीमियम Poco F7 Ultra चे 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 599 डॉलर (अंदाजे रु 51,000) किंमतीत लाँच करण्यात आले आहे. याशिवाय, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 649 डॉलर (सुमारे 55,000 रुपये) आहे. हा फोन ब्लॅक आणि येलो या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
तसेच, Poco F7 Pro च्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $449 (सुमारे 38,000 रुपये) आहे. याशिवाय 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $499 (अंदाजे 42,000 रुपये) आहे.
Poco F7 Ultra चे फीचर्स
Poco फोनमध्ये 6.67-इंच WQHD+ फ्लो AMOLED (1440×3200 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला असून, यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,200 nits ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. यात Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि 16GB LPDDR5X रॅमसह 512GB UFS 4.1 स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये पॉवरबॅकअपसाठी 5300mAh बॅटरी दिली असून, जी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट येते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर बॅक पॅनलवर 50MP मुख्य कॅमेरा, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 32MP अल्ट्रा-वाइड कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Poco F7 Pro चे स्पेसिफिकेशंस
Poco F7 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,200 nits ब्राइटनेससह येणारा 6.67-इंच WQHD+ फ्लो AMOLED डिस्प्ले दिला आहे. या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसरसह 12 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. यामध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. पोकोचा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित Xiaomi HyperOS 2 वर काम करतो.
यात फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सरसह कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच, सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.





