किंमत कमी आणि फीचर्स जबरदस्त, अवघ्या 10,499 रुपयात आला भारतीय कंपनीचा भन्नाट स्मार्टफोन

लावा कंपनीने भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Lava Bold 5G लाँच केला आहे. लावाचा हा फोन आकर्षक फीचर्स आणि कमी किंमतीसह येतो. Lava Bold 5G मध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, डायमेन्सिटी 6300 चिपसेट आणि IP-64 रेटिंगसह अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. लावाच्या या नवीन स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Lava Bold 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.67 इंच 3D कर्व्हड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. लावाचा हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेटसह येतो. डिव्हाइसमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅम फीचरच्या मदतीने युजर्स स्टोरेजला 8GB पर्यंत वाढवू शकतात. Lava Bold 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनला अँड्रॉइड 15 चे देखील अपडेट मिळणार आहे.
लावाच्या या फोनमध्ये मागील बाजूस AI पॉवर्ड 64MP चा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हा नवीन फोन पाणी आणि धूळीपासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंगसह येतो.
सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 33W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये स्टँडर्ड कनेक्टिव्हिटी फीचर्स जसे की ब्लूटूथ (Bluetooth), वाय-फाय (Wi-Fi), जीपीएस (GPS) इत्यादींचा समावेश आहे.
Lava Bold 5G ची किंमत
Lava Bold 5G स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. फोन 4 GB रॅम + 128 GB स्टोरेज आणि 6 GB रॅम + 128 GB स्टोरेजसह येतो. या फोनची सुरुवातीची किंमत 10,499 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.





