6,500mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह आला ‘या’ कंपनीचा स्मार्टफोन, किंमत तुमच्या बजेटमध्ये; पाहा फीचर्स

Vivo Y39 5G | Vivo ने भारतात Vivo Y39 5G या नवीन स्मार्टफोनला लाँच केले आहे. या डिव्हाइसमध्ये 6500mAh ची दमदार बॅटरी आणि 50 मेगापिक्सल एआय कॅमेऱ्यासह अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. Vivo Y39 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
Vivo Y39 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y39 5G मध्ये 6.68-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला असून, यात 120Hz रिफ्रेश रेट्स आणि 1000 नीट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळेल. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यात SCHOTT Xensation दिले आहे.
फोनमध्ये Octa Core Snapdragon 4 Gen 2 4nm प्रोसेसर सह Adreno 613 GPU दिला आहे. तसेच, 8GB LPDDR4x रॅम आणि 128/256GB स्टोरेज मिळते. हा फोन Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर काम करतो.
फोटोग्राफीसाठी विवोच्या या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअर दिला आहे. यात सोनीचा 50 मेगापिक्सलचा मुख्य एआय कॅमेरा दिला आहे. तर 2 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा मिळतो. तर सेल्फीसाठी फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी हा फोन 44W फास्ट चार्जिंगसह 6,500mAh च्या दमदार बॅटरीसह येतो.
Vivo Y39 5G ची किंमत
Vivo Y39 5G ची सुरुवाती किंमत 16,999 रुपये आहे. ही किंमत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तर, 8 जीबी + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे.
या फोनला Amazon India, Flipkart, Vivo India ई-कॉमर्स स्टोअर्सवरून खरेदी करता येईल. कंपनी लाँच ऑफर अंतर्गत फोनवर 1500 रुपयांपर्यंत फ्लॅट कॅशबॅक देत आहे. ही ऑफर 6 एप्रिलपर्यंत लागू आहे.





