5 हजारांच्या डिस्काउंटसह मिळतोय 108MP कॅमेऱ्यासह येणारा फोन, फक्त 10,999 रुपयात घेऊन जा घरी

Poco Smartphone Offers: तुम्ही जर दमदार कॅमेऱ्यासह येणारा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर POCO X6 Neo 5G हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणाऱ्या या फोनला Amazon Sale मध्ये खूपच स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या फोनमध्ये शानदार कॅमेरा, पॉवरफुल बॅटरीसह अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनवर सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Poco X6 Neo 5G ची किंमत आणि डिस्काउंट
Poco X6 Neo 5G चे 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपयात लाँच झाले होते. मात्र, ई-कॉमर्स साइट Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये हा फोन 4 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. पोकोच्या या फोनला तुम्ही सेलमध्ये फक्त 11,999 रुपयात खरेदी करू शकता.
याशिवाय, फोन खरेदी करताना एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 1 हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. अशाप्रकारे, फोनला 5 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह फक्त 10,999 रुपयात खरेदी करता येईल.
हा फोन हॉरिजन ब्लू, एस्ट्रल ब्लॅक आणि मार्शियन ऑरेंज रंगात येतो. फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. Amazon वर सुरू असलेल्या सेलची शेवटची तारीख 27 जानेवारी आहे. त्यामुळे डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फोन लवकरात लवकर खरेदी कराव लागेल.
Poco X6 Neo 5G चे फीचर्स
Poco X6 Neo 5G मध्ये 6.67 इंच फुल-एचडी प्लस रिझॉल्यूशनसह येणारा डिस्प्ले देण्यात आला असून, यात 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळेल. यात मीडियाटेक डायमेंसिटी 6080 प्रोसेसरसह 6जीबी रॅम दिली आहे. रॅमला 20 जीबीपर्यंत देखील वाढवू शकता.
फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह 2 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा मिळेल. तर फ्रंटला सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात पॉवर बॅकअपसाठी 33 वॉट फास्ट टाइप-सी चार्जरसह 5000 एमएएच बॅटरी मिळेल.





