पीएनजी एक्सक्लुझिव्हची विनाघट योजना ! सणासुदीत सोने-चांदीच्या दागिन्यांवर मिळणार आकर्षक सवलत

भारतात सणासुदीला हमखास होते ती नवनवीन सोने व चांदीच्या दागिन्यांची खरेदी. त्यात महिला अग्रेसर. जुने झालेले अलंकार देऊन नवीन आलेल्या दागिन्यांच्या व्हरायटीज घेण्याकडे महिलांचा कल जास्त असतो. पण जुन्या दागिन्यांवर सोनाराने घट घेतली तर? पण काळजी करू नका.विनाघट योजनेचे जनक पीएनजी एक्सक्लुझिव्हने याही वर्षी विनाघट योजना ग्राहकांसाठी आणली आहे.
ह्यामध्ये ग्राहकांनी कोणत्याही सोनाराकडून घेतलेला दागिना पीएनजी एक्सक्लुझिव्हच्या शोरूम्स मध्ये स्वीकारला जाणार आहे . तसेच नवीन सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट 30% सूट पण मिळणार आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट 100% सूट तसेच चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर फ्लॅट 30% सूट मिळणार आहे.
सोन्याच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेस, हार, गंठण, बाजूबंद, अंगठ्या, ब्रेसलेट ह्यांच्या आधुनिक व्हरायटीज, लाईटवेट ज्वेलरी, हिऱ्यांच्या दागिन्यांचे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन तसेच लाडक्या बाप्पासाठी चांदीची आकर्षक आभूषणे, चांदीच्या वस्तू उपलब्ध आहेत. ही ऑफर पीएनजी एक्सक्लुझिव्हच्या पुणे येथील निसर्ग हॉटेल लेन, नळस्टाॅप व रानडे कॅपिटल, बालेवाडी हायस्ट्रीटजवळ बाणेर येथे उपलब्ध असून ग्राहकांनी ह्याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन पीएनजी एक्सक्लुझिव्हचे भागीदार अभय गाडगीळ ह्यांनी केले आहे.





