पिंपरी | पीएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत कायम आस्थापनेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे पीएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महानगर आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचा-यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
पीएमआरडीएच्या कायम आस्थापनेवरील सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात कार्यरत असणाऱ्या गट क आणि ड मधील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. २४ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या सभेत त्याला मान्यता घेण्यात आली.
त्यानुसार संबंधित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त प्रती कर्मचारी २८ हजार ८७५ रुपये सानुग्रह अनुदान म्हणून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मान्यतेने प्रशासन विभागाचे सह-आयुक्त सुनील पांढरे यांनी यासंबंधी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी आदेश काढत लेखा वित्त विभागाला कळवले आहेत.





