पिंपरी | साखर कारखान्याच्या सभासदांची दिवाळी होणार गोड
Updated On:

पवनानगर, (वार्ताहर) – दिवाळी सणानिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात आली. यामध्ये मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर या भागातील सभासदांचा समावेश आहे.
कारखान्याच्या वतीने गटा गटामध्ये जाऊन सभासद शेतकऱ्यांना साखर वाटप करण्याचे काम सुरु आहे. पवनानगर – सोमाटणे गटातील सभासद शेतकऱ्यांना देखील सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे संचालक सखाराम गायकवाड, नरेंद्र ठाकर, शिवाजी पवार, सुभाष जाधव, शामराव राक्षे, सुनील काळे, किसन कदम, संजय मोहोळ, मोहन घरदाळे, सुनिल घरदाळे, सुरेश आडकर, लहु कालेकर, नवनाथ जांभुळकर, जालिंदर जांभुळकर, प्रकाश आडकर यांसह पवनमावळ परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते.





