नवी दिल्ली – करोनाच्या साथीमुळे संपूर्ण जग व्यापून टाकले आहे आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे सरकारच्या मदतीसाठी सढळ हाताने देणगी देण्यासाठी उत्स्फूर्तपणे असंख्य लोकांकडून विनंती केली जात आहे.
करोनाच्या साथीसारख्या कसोटीच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासठी समर्पित राष्ट्रीय निधीची गरज लक्षात घेऊन ‘आपत्कालीन परिस्थिती निधीसाठी पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत’ (पीएम-सिटीझन्स असिस्टन्स ऍन्ड रिलीफ इमर्जन्सी सिच्युएशन फंड अर्थात “पीएम केअर्स’ फंड) या नावाने सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री या ट्रस्टचे सदस्य आहेत.
या निधीमध्ये अगदी छोट्या रकमेची देणगी देखील देता येईल जेणेकरून जास्तीत जास्त लोक अगदी छोट्या प्रमाणात का होईना आपले योगदान देऊ शकतील. नागरिक आणि संघटना pmindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पंतप्रधान केअर्स निधीमध्ये पुढील माहिती भरून देणगी देऊ शकतात.