मोदींच्या सभेत कांदाप्रश्नावर घोषणाबाजी करणारा शेतकरी पोलिसांच्या ताब्यात, पाहा संपूर्ण Video

PM Narendra Modi | Onion – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना एका शेतकर्याने घोषणाबाजी केली. त्या शेतकर्याने कांद्यावर बोला, असे म्हणताच गोंधळ निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.
पिंपळगाव बसवंतमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तरी, कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आले.
सभेआधी कांदा उत्पादक शेतकर्यांचे प्रतिनिधी म्हणून जयदत्त होळकर (शरद पवार गट) यांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या माळा घालून निर्यातबंदी विरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
तर सभेत पंतप्रधान मोदी हे भाषण करत असताना एका शेतकर्याने कांद्यावर बोलण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यामुळे काही गोंधळ निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ संबंधित शेतकर्यास ताब्यात घेतले. त्यामुळे तणाव निवळला.
भाषणाच्या शेवटी कांदा प्रश्नावर मोदी काय म्हणाले, पाहा….. । PM Narendra Modi | Onion
भाषणाच्या शेवटी मोदी म्हणाले, “आमचे सरकार आहे ज्यांनी पाहिल्यंदा बफर स्टोक केला. मागील वर्षी 7 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला. आता 5 लाख टन मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी उठवली असून, आता 22 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. क्लस्टर निर्माण केल्यावर द्राक्ष उत्पादकांना फायदा होईल.’ असं पंतप्रधान मोदी म्हणाले.





