Indian Womens Team : वर्ल्ड चॅम्पियन्स टीमने घेतली पंतप्रधान मोदींची भेट! सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली खास जर्सी दिली भेट

Indian Womens Team Meet PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी महिला वर्ल्ड कप विजेता भारतीय क्रिकेट संघास भेटून त्यांचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि सुरुवातीच्या सलग तीन पराभवानंतर संघाने केलेल्या दमदार पुनरागमनाची प्रशंसा केली. यावेळी भारतीय संघाने पंतप्रधांन मोदींनी सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली नमो नावाची भारतीय संघाची जर्सी भेट म्हणून दिली.
देशाच्या हृदयातील स्थान –
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संघाने केवळ खेळाच्या मैदानावरच नाही, तर संपूर्ण देशाच्या हृदयामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हिने या भेटीची आठवण सांगताना नमूद केले की, त्यांनी २०१७ मध्ये ही पंतप्रधानांची भेट घेतली होती, पण तेव्हा त्यांच्याकडे ट्रॉफी नव्हती. हरमनप्रीत हसत म्हणाली की, “आता आमच्याकडे ट्रॉफी आहे, त्यामुळे आम्हाला त्यांना वारंवार भेटायला आवडेल.”
‘मेहनतचे फळ’ आणि प्रेरणा –
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महिला वर्ल्ड कप की चैम्पियन टीम से अपने आवास पर मुलाकात की.।।।।।❤️#PMModi #teamindia #worldcupChampion2025 pic.twitter.com/Ly7tG89Au6
— Himanshu Rajpoot (@Himanshu911986) November 5, 2025
उपकर्णधार स्मृती मानधना हिने सांगितले की, पंतप्रधानांनी तिला नेहमीच प्रेरणा दिली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे जात आहेत. यात पंतप्रधान मोदींचे योगदान महत्त्वाचे आहे. अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने यावेळी सांगितले की, ती पंतप्रधानांना भेटण्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होती. २०१७ मध्ये पंतप्रधानांनी ‘मेहनत करत राहा, एक दिवस तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होईल’, असे सांगितले होते आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे.पंतप्रधानांनी दीप्तीच्या ‘जय श्री राम’ इंस्टाग्राम पोस्टचा आणि तिच्या हातावरील हनुमान टॅटूचा ही उल्लेख केला. यावर दीप्तीने सांगितले की, हा टॅटू तिला “शक्ती आणि प्रेरणा” देतो.
हेही वाचा – IND vs SA : भारताचा कसोटी संघ जाहीर! ऋषभ पंतने पुनरागमन करताच ‘या’ खेळाडूला दिला डच्चू
‘फिट इंडिया’ अभियानाचा दिला संदेश –
या खास भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना ‘फिट इंडिया’ अभियान देशभरातील मुलींमध्ये पुढे नेण्याचे आवाहन केले. वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर चिंता व्यक्त करत ते म्हणाले की, यशस्वी होण्याइतकेच फिट राहणे देखील महत्त्वाचे आहे. पंतप्रधानांनी खेळाडूंना त्यांच्या शाळांमध्ये जाऊन मुलांना प्रेरित करण्यास सांगितले, जेणेकरून नवीन पिढी खेळांमध्ये सक्रिय होऊ शकेल. भारतीय खेळाडू क्रांती गौड हिने तिचा भाऊ पंतप्रधानांचा मोठा चाहता असल्याचे सांगितले असता, पंतप्रधान मोदींनी त्याला भेटण्यासाठी खुले आमंत्रण दिले.





