दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ‘ऑस्ट्रिया देश’ भारतासाठी किती महत्त्वाचा; जाणून घेऊया…

PM Modi In Austria । रशियानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रियाला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे तिसरे पंतप्रधान आहे. पंतप्रधान मोदींच्या आधी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनीही त्याकाळात ऑस्ट्रियाला भेट दिली होती. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनंतर ऑस्ट्रियाला यावेळी भेट देण्यात आली आहे.
PM Modi In Austria । ऑस्ट्रियाला हा छोटासा देश भारतासाठी किती महत्त्वाचा आहे आणि आत्तापर्यंत ऑस्ट्रिया आणि भारताचे संबंध कसे राहिले जाणून घेऊया…
भारतीय पंतप्रधान 41 वर्षांनंतर ऑस्ट्रियाला भेट देत असले तरी याआधी भारत आणि ऑस्ट्रियाचे राजनैतिक संबंध चांगले होते. जर आपण पंतप्रधानांबद्दल बोललो, तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी 1983 मध्ये ऑस्ट्रियाला गेल्या होत्या आणि त्यांचा हा दुसरा ऑस्ट्रिया दौरा होता. इंदिरा गांधी यांनी यापूर्वी 1971 मध्ये ऑस्ट्रियालाही भेट दिली होती. त्यांच्या आधी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1955 मध्ये ऑस्ट्रियाचा पहिला दौरा केला होता. भारताच्या पंतप्रधानांव्यतिरिक्त, तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी 1999 मध्ये ऑस्ट्रियाला आणि 2011 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी भेट दिली होती.
याशिवाय ऑस्ट्रियातील अनेक राजकारणीही भारतात आले आहे. 2005 मध्ये ऑस्ट्रियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हेन्झ फिशर यांनी भारताला भेट दिली होती. 1980 मध्ये तत्कालीन ऑस्ट्रियाचे चांसलर ब्रुनो क्रेस्की, 1984 मध्ये तत्कालीन ऑस्ट्रियाचे चांसलर फ्रेड सायनोवात्झ यांनी भारताला भेट दिली. याशिवाय दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध अबाधित आहेत. दोन्ही देश दीर्घकाळापासून एकमेकांशी व्यापार करत आहे.
भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण 16 व्या शतकातील आहे. राजकीय भेटीपूर्वीही भारत आणि ऑस्ट्रियाचे चांगले संबंध आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 आणि 1926 मध्येच तिथे भेट दिली होती. याशिवाय तेथे जवळपास 31 हजार भारतीय राहतात, ज्यामध्ये बहुतांश लोक पंजाब आणि केरळमधील आहेत. आरोग्य क्षेत्रासह अनेक ठिकाणी हे लोक काम करत आहेत.
PM Modi In Austria । ऑस्ट्रिया हा बिहारपेक्षा लहान
-ऑस्ट्रियाबद्दल बोलायचे झाले तर ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतीय राज्य बिहारपेक्षा लहान आहे. ऑस्ट्रिया केवळ 83,871 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे
-येथील एकूण लोकसंख्या सुमारे 90 लाख आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते बिहारपेक्षा लहान आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने ते दिल्लीपेक्षा लहान आहे.
-ऑस्ट्रियाला जगात ओळखले जाते कारण तो जगातील अव्वल राहण्यायोग्य देशांपैकी एक आहे.
-सुरक्षा, शिक्षण, पर्यावरण आणि आरोग्याच्या बाबतीत हा देश सर्वोत्तम देश मानला जातो. ऑस्ट्रिया देखील तिची संस्कृती, पर्यटन स्थळे आणि संगीतामुळे आकर्षक आहे.
PM Modi In Austria । भारतासाठी ऑस्ट्रिया महत्त्वाचे का..?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे भारत आणि ऑस्ट्रियामधील संबंध आणखी दृढ होणार आहे. तसेच, दोन्ही देशांदरम्यान आधीच होत असलेला व्यापार वाढवणे शक्य आहे.
-सध्या भारत आणि ऑस्ट्रियामधील द्विपक्षीय व्यापार सुमारे अडीच अब्ज अमेरिकन डॉलर्सचा आहे. सन 2021 मध्ये, भारताने US $ 1.29 अब्ज निर्यात केले आणि ऑस्ट्रियामधून US $ 1.18 अब्ज आयात केले. अशात हा व्यापार सुमारे २.४७ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा होता. अहवालानुसार, २०२३ मध्ये हा व्यापार २.९३ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
भारतातून इलेक्ट्रिकल वस्तू, मशीन्स, पादत्राणे, रेल्वेचे सुटे भाग, कपडे, सेंद्रिय रसायने, लोखंड आणि स्टीलची निर्यात केली जाते.
त्याच वेळी, भारत ऑस्ट्रियामधून स्टेपल फायबर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वैद्यकीय वस्तू, रसायने, प्लास्टिक आयात करतो. अशात पीएम मोदींच्या दौऱ्यामुळे हा व्यापार वाढेल, असे मानले जात आहे, कारण यादरम्यान पीएम मोदी अनेक कंपन्यांच्या सीईओंनाही भेटतील.
खरं तर, या वर्षीच भारत आणि ऑस्ट्रिया दरम्यान स्टार्टअप ब्रिज सुरू करण्यात आला होता, ज्या अंतर्गत दोन्ही देशांच्या स्टार्टअप्सने एकमेकांशी व्यापार करण्यावर भर दिला जात आहे. याअंतर्गत स्टार्टअप दोन्ही देशांना भेट देत आहे. अशात आता छोट्या कंपन्याही दोन्ही देशांशी जोडल्या गेल्या आहे. मध्य युरोपातील महत्त्वाचा देश असल्याने ऑस्ट्रिया भारतासाठी खास आहे आणि चांगल्या संबंधांमुळे पायाभूत सुविधा, ऊर्जा, तंत्रज्ञान, स्टार्टअप, मनोरंजन या क्षेत्रांमध्ये भारत आणि ऑस्ट्रियाला फायदा होईल.





