बँकPM Kisan Samman Nidhi: पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता कधी जमा होणार? तारीख जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi: – शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २०वा हप्ता येत्या उद्या म्हणजेच १८ जुलै रोजी जारी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतिहारी (पूर्वी चंपारण) येथे होणाऱ्या एका भव्य जाहीर सभेत हा हप्ताही अधिकृतरीत्या जाहीर करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२,००० –
या टप्प्यात देशभरातील ९.८ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ₹२,००० ची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे थेट जमा केली जाईल. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण ₹६,००० ची आर्थिक मदत दिली जाते.
फेब्रुवारी २०२५ मध्ये मिळाला होता १९वा हप्ता –
यापूर्वीचा १९वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये वितरित करण्यात आला होता. त्यामध्ये २.४१ कोटी महिला शेतकऱ्यांसह एकूण ९.८ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना ₹२२,००० कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या तिमाहीत हप्ताच्या वितरणात काहीशी विलंब झाला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी:
-आपले बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक.
-DBT सेवा खात्यावर सक्रिय असावी.
-ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेले असावे.
-‘Know Your Status’ पर्यायाद्वारे आपल्या लाभार्थी स्थितीची खात्री करा.
लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे?
-अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
-‘Dashboard’ टॅबवर क्लिक करा (भारताच्या नकाशाखालील पिवळ्या रंगाचा पर्याय).
-राज्य, जिल्हा, तालुका व पंचायत निवडा.
-‘Get Report’ क्लिक करून यादीमध्ये आपले नाव तपासा.
जमिनीची माहिती अपडेट कशी करावी?
-वेबसाईटवर ‘Farmers Corner’ मध्ये ‘State Transfer Request’ वर क्लिक करा.
-आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक भरा.
-स्क्रीनवरील कॅप्चा कोड टाका आणि ‘Get OTP’ वर क्लिक करा.
-आलेला OTP भरा आणि जमीन कागदपत्रे (खसरा, खतौनी) अपलोड करा.
-फॉर्म तपासून सबमिट करा.
सहाय्य हवे असल्यास हे हेल्पलाईन पर्याय उपलब्ध:
टोल-फ्री क्रमांक: 155261 किंवा 1800-115-526
ई-मेल: [email protected]





