24 फेब्रुवारीला खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता, त्वरित करा ‘हे’ काम; अन्यथा मिळणार नाही पैसे

PM-Kisan Samman Nidhi | केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत गरजू शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेंतर्गत 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. तर 19व्या हप्त्याची तारीख देखील समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 फेब्रुवारीला या योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार आहे. या दिवशी पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. येथूनच देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता जारी केला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याबाबत माहिती दिली होती. याआधी 18वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून जारी करण्यात आला होता.
खुशहाली और समृद्धि के खुलेंगे द्वार, जब किसानों के खातों में आएंगे ₹2000
माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी पीएम किसान सम्मान निधि की 19वीं किस्त का ट्रांसफर 24 फरवरी 2025 को भागलपुर, बिहार से करेंगे।
सभी किसान भाई-बहन योजना का लाभ उठाने के लिए आज ही अपनी eKYC पूरी करवाएं।… pic.twitter.com/XvoBFDR0H3
— Agriculture INDIA (@AgriGoI) February 17, 2025
ई-केवायसी गरजेचे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जर तुम्ही अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला 19वा हप्ता मिळणार नाही.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. शेतकरी स्वतः ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
ई-केवायसी करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
- ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- होम पेजवरील Farmers Corner सेक्शनमध्ये जाऊन eKYC पर्याय निवडा.
- आता eKYC पेजवर जाऊन तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- आधार क्रमांक टाकल्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
- यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाका
- मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या आधारला लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल.
- OTP टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- सबमिट करताच तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
या योजनेशी संबंधित कोणतीही समस्या अथवा माहिती हवी असल्यास [email protected] या ईमेल आयडी आणि 155261/ 1800115526/011-23381092 या क्रमांकावर संपर्क करू शकता.





