nagar | वृक्ष लागवड हा तालुक्यात उत्सव व्हावा – सुजित झावरे पाटील

पारनेर, (प्रतिनिधी)- विज्ञान युगाच्या चर्चा करत असताना भौतिक सुखासाठी होणारी प्रचंड वृक्षतोड ही मानवाच्या भावी काळातील अधोगतीची चाहूल आहे. शहरात मोठया इमारती, रस्ते, सुशोभिकरण या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड ही आपण आपल्या पुढच्या पिढीला दिलेला शाप ठरणार असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले.
वासुंदे येथे देवकृपा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पारनेर तालुक्यामध्ये देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या काळात दहा हजारांपेक्षा जास्त झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेणार आहे. त्याची सुरुवात आज वासुंदे येथून आम्ही केली आहे.
हा उपक्रम पारनेर तालुक्यात उत्सव व्हावा. या उपक्रमात आवळा, बोखर, कडीपता, कडुलिंब, चिंच, आंबा, अर्जुन साताडा, जाभंळ, वड, शिसु, कांचन, पिंपळ या वनऔषधी वनस्पतीचा वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सुजित झावरे यांनी सांगितले.
यावेळी रणजित पाटील, शरद पाटील, भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन नारायण झावरे, व्हा. चेअरमन रा. बा. झावरे, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, पोपटराव झावरे, लहानभाऊ झावरे, पोपटराव हिंगडे, शांताराम झावरे, विलास हिंगडे, लक्ष्मण झावरे, स्वप्निल झावरे, डॉ. प्रसाद झावरे, दत्तात्रय बर्वे, रामचंद झावरे,
पोपटराव बर्वे, निखिल दाते, शंकर झावरे, गणेश झावरे, मनोज झावरे, संग्राम झावरे, मारूती उगले सर, अमोल पोटघन, विकास झावरे, सुरेश शिंदे, बाळासाहेब झावरे, अशोक झावरे, साधना जगदाळे, उज्वला हिंगडे, शिवाजी गायखे, मच्छिंद्र झावरे, अशोक बर्वे, पंढरीनाथ हिंगडे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपक्रमात उपस्थित होते.





