#PKLSeason10 (#UPvCHE Match 65) : तमिळ संघाचे वर्चस्व कायम; युपी योद्धाजवर दमदार विजय…

Pro Kabaddi 2023-24 : – प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यांत तमिळ थलैवाज संघाने युपी योद्धाज संघावर ४६-२७ अशी मात केली. या वियाच्या जोरावर तमिळ संघाने यंदाच्या मोसमातील स्पर्धेत आपले आव्हान आणखी भक्कम केले. या सामन्यात नरेंद्र होशियार तमिळ संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
இந்த போஸ்ட் போட தானே காத்திருந்தேன் 😍
தமிழ் தலைவாஸ் 19 புள்ளிகள் வித்தியாசத்தில் வெற்றி
நீண்ட நாட்களுக்கு பிறகு கிடைத்த வெற்றி 💥😍#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #TamilThalaivas #UPvCHE pic.twitter.com/BGBQz40RFU
— ProKabaddi (@ProKabaddi) January 10, 2024
या सामन्यात पहिल्या सत्रात बलाढ्य युपी संघावर तमिळ संघाने १९-१४ अशी आघाडी घेतली. त्यात तमिळ संघाकडून नरेंद्र होशियार व साहील सिंग यांनी जबरदस्त वर्चस्व राखले. त्यांनी अफलातून पकडी केल्या. तसेच त्यांनी रेड गुणांतही निसटती का होऊना पण बाजी मारली. त्यांना अजिंक्य पवार व मोहित यांनीही तोलामोलाची साथ दिली व पहिले सत्र संपले तेव्हा तमिळ संघाला आघाडीही मिळवून दिली. पहिल्या सत्रात युपी संघाच्या विजय मलिकने कडवी लढत दिली. मात्र, त्याला अन्य खेळाडूंची साथ लाभली नाही व त्यांना तमिळ संघावर दडपणच टाकता आले नाही.
#PKLSeason10 (#TTvBEN Match 64) : बंगाल वॉरियर्सचा तेलगु टायटन्सवर मोठा विजय…
दुसरे सत्र सुरु झाल्यारही तमिळ संघाने आक्रमण वाढवले. मात्र, या वेळी युपी संघाच्या खेळाडूंनीही आक्रमक खेळ केला. त्यांनीही महत्वाचे रेड व टॅक गुणांची कमाई करत मोठी आघाडी कमी केली. त्यानंतर मात्र, युपीचा संघ सर्वबाद झाला व त्याच्या गुणांसह बोनस गुणही तमिळ संघाला मिळाले व त्यांनी पुन्हा एकदा गुणसंख्येत मोठी झेप घेतली.
नरेंद्र होशियारने सर्वाधिक ११ रेड गुणांसह ३ बोनस असे एकूण १४ गुण पटकावत विजयात मोठा वाटा उचलला. युपी संघाच्या विजय मलिकने १० गुणांची कमाई करताना अखेरच्या काही मिनिटांत चांगलीलढथ देण्याचा प्रयत्न केला मात्र, तरीही तो संघाचा पराभव टाळू शखला नाही.





