Pro Kabaddi 2024 : दिल्ली, गुजरात संघाचे दमदार विजय….

Pro Kabaddi 2024 : – दबंग दिल्ली संघाने जयपूर पिंक पँथर्स संघाला तर गुजरात जायंट्स संघाने तेलगू टायटन्स संघाला पराभूत करताना प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या हंगामात विजयाची नोंद केली.
रेडर आशू मलिकच्या दमदार खेळाच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने जयपूर पिंक पँथर्स संघाला ३५-२१ असे पराभूत केले. दबंग दिल्ली संघाने मध्यंतराला १७-९ अशी आघाडी घेतली होती.
दबंग छोरों की दबंग परफॉर्मेंस 🔥
दर्ज की #PKL11 सीज़न की छठी जीत 💙#ProKabaddi #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #JaipurPinkPanthers #DabangDelhiKC pic.twitter.com/TGDNyMrTiK
— ProKabaddi (@ProKabaddi) November 22, 2024
दोन्ही संघांनी चढाईतून प्रत्येकी १३ गुणांची कमाई केली. पकडीतून दबंग दिल्ली संघाने २२ तर जयपूर पिंक पँथर्स संघाने १८ गुणांची कमाई केली. दिल्ली संघाकडून आशू मलिकने ९ गुणांची कमाई करताना संघाला विजय मिळवून दिला. अर्जुन देशवालने ७ गुण मिळविताना चांगली लढत दिली.
Giants storm through the Titans with a Saturday night special 💥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #GujaratGiants #TeluguTitans pic.twitter.com/o3TrATgvZw
— ProKabaddi (@ProKabaddi) November 23, 2024
गुजरात जायंट्स विजयी….
प्रतीक दहियाच्या सुपर १० च्या जोरावर गुजरात जायंट्स संघाने तेलगू टायटन्स संघाला ३१-२८ असे केवळ ३ गुणांची पराभूत केले. तेलगू टायटन्सने चढाईतून २१ तर पकडीतून ६ गुणांची कमाई केली. गुजरात जायंट्स संघाने चढाईतून १६ तर पकडीतून १२ गुणांची कमाई केली. गुजरात संघाकडून प्रतीक दहियाने ११ गुणांची कमाई करताना विजय साकारला.





