Haryana Steelers vs U Mumba, Pro Kabaddi League 2024 (Panchkula) : प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये, शनिवारी, विशाल टेटे (15 गुण) च्या चमकदार कामगिरीमुळे, हरियाणा स्टीलर्सने ताऊ देवी लाल इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 124 व्या सामन्यात यू मुंबाचा 46-40 असा पराभव केला. विशाल व्यतिरिक्त नवीन कुंडूने (सहा गुण) हरियाणा स्टीलर्ससाठी हाय-5 पूर्ण केले.
हरियाणा के धाकड़ छोरों ने मुम्बा की सेना को हराकर दर्ज की अपनी 13वीं जीत 💪🔥#HSvMUM मुक़ाबले में किस रेडर ने जीता आपका दिल? 💙#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL10 #PKL #HarSaansMeinKabaddi #HaryanaSteelers #UMumba pic.twitter.com/eln3SEAoFp
— ProKabaddi (@ProKabaddi) February 17, 2024
हरियाणा स्टीलर्सचा 20 सामन्यांमधला हा 13वा विजय होता आणि संघ आता 70 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. यू मुंबईचा 21 सामन्यांत 13वा पराभव झाला.
पूर्वार्धात 15 गुणांनी पिछाडीवर पडल्यानंतर मुंबाने उत्तरार्धात जोरदार पुनरागमन केले, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. पूर्वार्धात हरियाणा स्टीलर्स संघ 30-15 ने आघाडीवर होता. मुंबासाठी गुमान सिंगने आठ गुण मिळवले. सामन्याच्या 35व्या मिनिटापर्यंत हरियाणाकडे 39-37 अशी आघाडी होती. त्यानंतर शेवटच्या दोन मिनिटांत स्टीलर्सकडे चार गुणांची आघाडी होती आणि संघाने ती कायम राखली आणि 46-40 असा विजय मिळवला.