Pro-Kabaddi League 2023-24 : प्रो-कबड्डी लीगमध्ये मंगळवारी बंगाल वॉरिअर्स संघाने तुलनेने दुबळ्या पाठमा पायरट्स संघाचा ६० विरुद्ध ४२ असा दणदणीत पराभव केला. या लढतीत मनींदर सिंग, नितीन कुमार व श्रीकांत जाधव यांनी अफलातून खेळ करत पाटणा संघावर दडपण कायम राखत संघाचा एकतर्फी विजय साकार केला.
सीजन का सबसे बड़ा स्कोर बनाते हुए बंगाल ने दर्ज की धाकड़ जीत 💪
माइटी मनिंदर, नितिन और श्रीकांत की तिकड़ी को कितने ⭐ देंगे आप❓💬#ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #BengalWarriors #PatnaPirates #BENvPAT pic.twitter.com/8u1ERsOfST
— ProKabaddi (@ProKabaddi) December 12, 2023
या सामन्यात पहिले सत्र सुरु झाल्यापासूनच बंगालने वर्चस्व राखले होते. त्यांच्या भरात असलेल्या मनींदर सिंगने त्यांना सुरुवातही चांगली करुन दिली. पहिले सत्र संपले तेव्हा बंगालचा संघ २७-१७ असा मोठ्या आघाडीवर होता. दुसरे सत्र सुरु झाल्यावर पाटणा संघानेही काही चांगल्या चाली रचल्या व महत्वाचे गुणही मिळवले. मात्र, ते आपला बचाव भक्कम करु शकले नाहीत व त्याचाच लाभ बंगालच्या खेळाडूंनी घेतला.
#PKLSeason10 (#BLRvUP Match 19) : बंगळुरुची युपीवर थरारक मात
मनींदरने १५, नितिन कुमारने १४ व श्रीकांत जाधवने १२ गुणांची कमाई केली व या त्रिकुटासमोर पाटणा संघाचे अपयश जास्त उठून दिसले. बंगाने ४२ रेड गुण मिळवताना टॅकलमध्ये ११ गुणांचीही कमाई केली. सुपर रेडचेही ३ गुण त्यांनी पटकावले. तसेच पाटमा संघाचा बचाव कमकुवत ठरवताना सर्वबादचे ६ गुण प्राप्त केले.
#PKLSeason10 (#JPPvGG Match 18) : जयपूरचा गुजरात जायंट्सवर रोमहर्षक विजय…
पाटणा संघाकडून सचिन व सुधाकर एम या दोन खेळाडूंनी जिद्दी खेळ केला. या दोघांनीही प्रत्येकी १४ गुणांची कमाई केली. त्यांच्याच कामगिरीच्या जोरावर पाटणा संघाने ३५ रेड गुण मिळवत कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, तरीही ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. बंगालचे खेळाडू सातत्याने पाटणा संघावरील दडपण वाढवत होते त्यामुळेच सामना अखेरच्या काही मिनिटात रंगतदार होइल ही अपेक्षा फोल ठरली व बंगालने ६०-४२ असा मोठा विजय प्राप्त केला.