बंगळुरू :- प्रो-कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या 18 व्या लढतीत जयपूर पिंक पॅंथर्सने पिछाडीवरून बाजी मारताना गुजरात जायंट्सवर ३५-३२ अशी अवघ्या दोन गुणांनी मात केली. तर प्रो-कबड्डी लीगमध्येच सोमवारी झालेल्या दुसऱ्या व 19 व्या लढतीत बंगळुरु बुल्सने युपी योद्धा संघाचा ३८-३६ असा केवळ दोन गुणांनी पराभव केला व स्पर्धेत आगेकूच कायम राखली.
ಇಂದು ಕಂಠೀರವ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಬುಲ್ಸ್ ಆಚರಿಸುತ್ತಿದೆ ವಿಜಯೋತ್ಸವ! 😍🥳#ProKabaddi #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #BLRvUP #BengaluruBulls #UPYoddhas pic.twitter.com/AqUNRVr2D8
— ProKabaddi (@ProKabaddi) December 11, 2023
युपी योद्धाचा प्रदीप नरवाल, विजय मलिक व सुरेंद्र गिल यांनी अफलातून खेळ केला. त्यांच्या पकडीही इतक्या मजबूत होत्या की बंगळुरु बुल्सच्या खेळाडूंना त्याचा प्रतिकारही करता आला नाही. मात्र, पहिल्या सत्रात बंगळुरुने घेतलेली आघाडी युपी योद्धाला दुसरे सत्र सुरु झाल्यावरही कमी करता आली नाही.
बंगळुरूचा विकास खंडोला, भरत व सौरभ नंदाल यांनी युपीच्या खेळाडूंची कोंडी केली होती. बंगळुरुने पहिल्या सत्रापासूनच आघाडी टीकवली तसेच त्यांनी दुसरे सत्र सुरु झाल्यावरही युपी संघाच्या एकाही खेळाडूला शिरजोर होऊ दिले नाही. रेड गुणांमध्ये युपी संघ जास्त सरस होता मात्र, टॅकल गुणांतच ते पहिल्यापासून कमी पडले. त्यातच बंगळुरुने सर्वबादचे ४ गुण मिळवताना अतिरीक्त ३ गुणांचीही कमाई केली.
#PKLSeason10 (#JPPvGG Match 18) : जयपूरचा गुजरात जायंट्सवर रोमहर्षक विजय…
इथेच युपी योद्धाचा पराभव स्पष्ट दिसू लागला होता. मात्र, सामना संपण्यास काही मिनिटांचाच अवधी असताना युपीनेही आक्रमक खेळ केला व गुणांतील तफावत ३६-२६ वरून ३६-३४ अशी करत बंगळुरुलाच पराभवाच्या खाईत लोटले होते. मात्र, अखेर त्यांना अवघ्या दोन गुणांनी हा सामना गमवावा लागला. भरतने अखेरच्या काही मिनिटांत केलेल्या अफलातून खेळाच्या जोरावर बंगळुरुने हा सामना जिंकला.