PKL 2025 : अर्जुन देशवालचा जलवा! तमिळ थलाइवाजने पहिल्याच सामन्यात तेलुगू टायटन्सला चारली धूळ

PKL 2025 Tamil Thalaivas beat Telugu Titans : प्रो कबड्डी लीगच्या 12व्या सीझनला 29 ऑगस्ट रोजी विशाखापट्टणम येथील विश्वनाथ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दणक्यात सुरुवात झाली. उद्घाटन सामन्यात तमिळ थलाइवाजने तेलुगू टायटन्सवर रोमांचक लढतीत 38-35 असा तीन पॉइंट्सनी विजय मिळवला.
तमिळ थलाइवाजची विजयी सलमी –
या सामन्यात तमिळ थलाइवाजने 21 रेड पॉइंट्स, 11 टॅकल पॉइंट्स, 4 एक्सट्रा पॉइंट्स आणि ऑल-आउटमधून 2 पॉइंट्ससह एकूण 38 गुण मिळवले. दुसरीकडे, तेलुगू टायटन्सने 18 रेड पॉइंट्स, 11 टॅकल पॉइंट्स, 4 एक्सट्रा पॉइंट्स आणि ऑल-आउटमधून 2 पॉइंट्ससह एकूण 35 पॉइंट्स मिळवले.
கடைசில இறங்கி அடிச்சு முதல் வெற்றியை பிடிச்சாச்சு 😍🔥
பவன் பவர் 🙏#PKL12 #ProKabaddi #TamilThalaivas #TeluguTitans pic.twitter.com/LZZd1zRqHy
— ProKabaddi (@ProKabaddi) August 29, 2025
तमिळ थलाइवाजच्या विजयात अर्जुनने बजावली महत्त्वाची भूमिका –
Stop him if you can – Arjun Deshwal 🔥#ProKabaddi #PKL12 #TeluguTitans #TamilThalaivas #GhusKarMaarenge pic.twitter.com/uyBiwQ2Gxs
— ProKabaddi (@ProKabaddi) August 29, 2025
दोन्ही संघांनी खेळाच्या प्रत्येक पैलूत उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु तमिळ थलाइवाजने शेवटी तीन पॉइंट्सनी आघाडी घेत विजय निश्चित केला. तमिळ थलाइवाजच्या विजयात अर्जुन देशवालने 12 पॉइंट्ससह शानदार प्रदर्शन केले, तर पवन सेहरावतने 9 पॉइंट्सचे योगदान दिले. तेलुगू टायटन्सकडून भरतने सर्वाधिक 11 पॉइंट्स मिळवले, तर विजय मलिकने 6 आणि शुभम शिंदेने 4 पॉइंट्स मिळवले.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : W, W, W, W, ४ चेंडू, ४ विकेट्स…! काश्मीरच्या औकिब नबीने धुमाकूळ घालत रचला इतिहास
तमिळ थलाइवाजसाठी हा विजय सीझनच्या सकारात्मक सुरुवातीचा संकेत आहे, तर तेलुगू टायटन्सला पुढील सामन्यांमध्ये सुधारणा करावी लागेल. अशा प्रकारे पहिल्याच सामन्याने स्पष्ट केले आहे की, सीझन 12 मध्ये प्रेक्षकांना अनेक रोमांचक सामन्यांची पर्वणी पाहायला मिळणार आहे.





