Hardik Pandya : आशिया कपपूर्वी हार्दिक पंड्याच्या नव्या लूकने वेधलं लक्ष, सँडी ब्लॉन्ड रंगाची हेअर स्टाईल होतेय व्हायरल

Hardik Pandya New Look Viral : आशिया कप 2025 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर यूएईविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ दुबईत दाखल झाला असून, 5 सप्टेंबर रोजी आयसीसी अकादमीत पहिले सराव सत्र आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान, आशिया कपच्या अगोदर भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा नवीन लूक समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांना त्याला ओळखणे थोडे कठीण जात आहे.
हार्दिकने केसांना लावला सँडी ब्लॉन्ड रंग –
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या नवीन लूकची माहिती सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना दिली. हार्दिकने आपल्या केसांना सँडी ब्लॉन्ड रंग दिला आहे. या नवीन रंगामुळे हार्दिकचा लूक अत्यंत आकर्षक दिसत आहे. त्याने वेगवेगळ्या पोजमधील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या या नव्या लूकची जोरदार चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
आशिया कपमध्ये हार्दिकची कामगिरी ठरणार महत्त्वाची –
Different tournaments, different Hardik Pandya, different hairstyles😍
Hardik Pandya keeps setting trends both on and off the field.
#HardikPandya #Cricket pic.twitter.com/b1TxRGaFqR— CricTracker (@Cricketracker) September 5, 2025
हार्दिक पंड्या बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर पुनरागमन करत आहे. यापूर्वी त्याने यावर्षीच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आता आशिया कप 2025 मध्ये हार्दिकची कामगिरी भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. गोलंदाजीत त्याचे चार षटके निर्णायक ठरतील, तर फलंदाजीत फिनिशरची भूमिका त्याच्यावर असणार आहे.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : ‘अजून बरचं काही साध्य करायचंय…’, सेमीफायनलमधील शतकानंतर ऋतुराज गायकवाडची प्रतिक्रिया
आतापर्यंत हार्दिकने ही भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे. याशिवाय, आशिया कपमध्ये हार्दिकला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करण्याची संधी आहे. सध्या तो या टप्प्यापासून फक्त 5 षटकार दूर आहे. जर त्याने हे यश मिळवले, तर तो रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर भारताचा चौथा खेळाडू ठरेल.
हेही वाचा – Hockey Asia Cup 2025 : भारताची आशिया कपमधील विजयी घोडदौड कायम! मलेशियावर मात करत पूल-ए मध्ये राखले वर्चस्व
आशिया कप 2025 साठी भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.स्टँडबाय खेळाडू: प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, रियान पराग, यशस्वी जैस्वाल





