Pimpri News : गांधी विचारांचा जागर! मदरशात अनाथ मुलांनी घेतली अहिंसेची शपथ

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दापोडी येथील मदरशात हिंदू व मुस्लिमांनी एक.ित्रतपणे अहिंसेची शपथ घेतली. यावेळी मदरसामधील अनाथ मुलांनी देखील शपथ घेतली.मोलाना कारी इकबाल व नजीर मुजावर, संजय कणसे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी अहिंसा गौरव पुरस्कार 2025 फुलचंद यादव, मधुकर रणपिसे, नरेंद्र टाक, प्रकाश तारा, सुभाष जाधव, ह भ प चंद्रकांत महाराज सोनवणे, संतलाल यादव, ह भ प ज्ञानेश्वर महाराज भाडळे, ह भ प राजेंद्र काळभोर, रवींद्र यादव यांना प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी अनाथ मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी गणेश कांबळे, मंजूर शेख, नदीम पठाण, मंगेश मोरे, असिफ मणियार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी मुजावर यांनी केले तर आभार प्रदर्शन देवेंद्रसिंग यादव यांनी केले.





