Pimpri Crime | महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई ; खंडणीखोर टोळीवर मोक्का लावला!

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई केली. सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे.वासोली परिसरातील एका व्यावसायिकाला महिन्याला १० हजार रुपयांची खंडणी मागत अपहरण करून मारहाण करण्यात आली होती.
या प्रकरणात नारायण घावटे, ऋषिकेश रोकडे, रोशन गोगावले, अनिल शिंदे आणि गणेश लिंभोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या टोळीवर ६ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.याशिवाय सराईत गुन्हेगार रामदास हानपुडे आणि प्रल्हाद बच्चे यांच्यावर अनुक्रमे ६ आणि ४ गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल देवडे व त्यांच्या पथकाने केली.





