प्रभात वृत्तसेवा पिंपरी – वाहतुकीवरील निर्बंध असताना जड वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात स्कूटीवरील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना पांडवनगर, माणरोड, ता. मुळशी येथे शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.मोहम्मद अल्ताफ (वय २४, धंदा ड्रायव्हर, रा. प्रोटॉन आरएमसी प्रोजेक्ट, वाघजाई मंदिरासमोर, मांडेकर पेट्रोल पंपाजवळ, चांदे, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुनहा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. राजेशकुमार लालचंद मिश्रा (वय ३६, रा. बारणे कॉर्नर, तुळजाभवानी मंदिराजवळ, तळजाई कॉलनी, थेरगाव) यांनी शुक्रवारी (दि. १०) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्ताफ यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक हे जड वाहन वाहतुकीवरील निर्बंध असताना चालवले. सदर वाहन भरधाव वेगाने चालवत असताना त्याने फिर्यादींच्या पत्नी चालवत असलेल्या स्कूटी (क्रमांक MH 14 EX 1341) यास जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेचा गंभीर जखमेमुळे मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.