Pimpri Accident: रस्ता ओलांडताना क्रेनची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – भरधाव वेगातील हायड्रोलिक क्रेनने धडक दिल्यामुळे रस्ता ओलांडत असलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नखाते चौक, रहाटणी येथे घडला.उमेश करिमन चौहान (वय २५ वर्षे, रा. शास्त्री नगर, काळेवाडी. मूळ रा. जि. बक्सर, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शुभम तानाजी खानेकर (वय ३० वर्षे, रा. जीवननगर, ताथवडे) यांनी गुरुवारी (दि. १) याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आजी रस्ता ओलांडत असताना क्रेन क्रमांक MH-14 LJ 4227 या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. काळेवाडी पोलीस ठाणे याबाबत तपास करीत आहे.





