Pimpri Accident : रिक्षाचा वेग जीवावर बेतला! पिंपळे गुरवमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला भरधाव वेगातील रिक्षाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान घडली.शांताबाई रोहिदास कांबळे (वय ५४) असे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गणेश रोडियास कांबळे (वय १९, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी शनिवारी (दि. १५) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आनंद लक्ष्मण गायकवाड (वय ५१, रा. भिमाशंकर कॉलनी, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांची आई शांताबाई या पिंपळे गुरवमधील बॅक ऑफ महाराष्ट्रजवळ रस्ता ओलांडत होत्या.
त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शांताबाई या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.




