नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Nawazuddin Siddiqui Daughter | अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या उत्तम अभिनयानाच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यानंतर त्याने अलीकडेच निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप आणि शेन ग्रेगॉइर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. यावेळी नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत त्याची मुलगी शोराही उपस्थित होती.
नवाजुद्दीन आपल्या मुलीसोबत आलिया आणि शेनच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दाखल होताच सर्वजण वडील आणि लेकीच्या जोडीकडे पाहत राहिले. यावेळी शोराच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पापाराझी अकाऊंटवरून बापलेकीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तसेच नेटकरी देखील शोराचं सौंदर्य पाहून तिचे कौतुक करत आहे.
दरम्यान, नवाजुद्दीनची मुलगी शोराही त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे आणि अभिनय शिकत आहे. नवाजुद्दीनने देखील एका मुलाखतीत शोराला अभिनय क्षेत्रात काम करायचे असल्याचे सांगितले होते. पूर्वी शोरा लाइमलाइटपासून अंतर ठेवायची, आता ती तिच्या वडिलांसोबत अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपच्या रिसेप्शनमध्ये दिसली.
शोरा अवघ्या 14 वर्षांची आहे. तिच्या साधेपणात तिने इतर स्टार किड्सला मागे टाकल्याचे दिसत आहे. Nawazuddin Siddiqui Daughter |
हेही वाचा :





