Phil Salt Record : फिल सॉल्टचा ‘गोल्डन डक’ धमाका! आयपीएलमध्ये ‘या’ ३ संघाकडून खेळताना नोंदवला नकोसा विक्रम
Phil Salt Golden Duck : आरसीबीचा सलामीवीर फिल सॉल्ट याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

Phil Salt unwanted record IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या १६ व्या सामन्यात आरसीबी आणि आरआर यांच्यात रंगलेल्या लढतीत आरसीबीचा सलामीवीर फिल सॉल्ट याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली. गुवाहाटीच्या मैदानावर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होऊन सॉल्टने आयपीएलमधील एका लाजिरवाण्या यादीत स्थान मिळवले आहे.
बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर पूल शॉट मारण्याच्या नादात सॉल्टने ध्रुव जुरेलकडे सोपा झेल दिला. या ‘गोल्डन डक’सह फिल सॉल्ट आता आयपीएल इतिहासात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा (३ वेळा) बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जाऊन बसला आहे.
पार्थिव पटेल अजूनही अव्वल –
WHAT AN OPENING DELIVERY BY JOFRA ARCHER. 🤯 pic.twitter.com/DNwqGBbbXf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2026
आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा बाद होण्याचा विक्रम भारताच्या पार्थिव पटेलच्या नावावर आहे, जो ४ वेळा अशा प्रकारे बाद झाला आहे. फिल सॉल्ट आता ड्वेन स्मिथ, पृथ्वी शॉ आणि केएल राहुल यांच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. हे सर्व फलंदाज ३ वेळा डावाच्या पहिल्या चेंडूवर तंबूत परतले आहेत.
फिल सॉल्टचा ‘गोल्डन डक’ प्रवास –
सॉल्ट पहिल्या चेंडूवर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध मोहम्मद शमीने त्याला पहिल्या चेंडूवर बाद केले होते. त्यानंतर २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध तुषार देशपांडेने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. यानंतर आता राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने त्याला पहिल्या चेंडूवर बाद केले.
हेही वाचा -Virat Kohli Bowled : किंग कोहली अडकला बिश्नोईच्या ‘चक्रव्यूहात’! क्लीन बोल्ड करत विराटचा केला गेम, पाहा VIDEO
विशेष म्हणजे, सॉल्टने तिन्ही वेळा वेगवेगळ्या संघांकडून (दिल्ली कॅपिटल्स, केकेआर आणि आता आरसीबी) खेळताना हा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आरसीबीसाठी सलामीला येऊन अशा प्रकारे बाद होणे संघासाठी मोठा धक्का होता.





