Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार ?
Petrol-Diesel: होर्मुझ सामुद्रधूनीतील वाहतूक वेगाने पुर्ववत होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे खनिज तेलाचे दर वेगाने कमी होण्याची शक्यता वाढली आहे.

Petrol-Diesel: होर्मुझ सामुद्रधूनीतील वाहतूक वेगाने पुर्ववत होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे खनिज तेलाचे दर वेगाने कमी होण्याची शक्यता वाढली आहे. जागतिक तेल मानक असलेला ब्रेंट क्रूड, वायदे बाजारात 0.65 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 79.33 डॉलरवर व्यवहार करत होता. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होणार आहे.
दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 0.08 टक्क्यांनी घसरून 100.76 वर व्यवहार करत होता. अमेरीकेत व्याजदर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
डॉलर निर्देशांक मजबूत झाल्याने रुपयाने सुरुवातीची बहुतेक वाढ गमावली आणि शुक्रवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत केवळ 6 पैशांनी वधारून 94.34 (तात्पुरता) अंकांवर दिवसअखेर बंद झाला. गुरुवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 10 पैशांनी वाढून 94.40 वर स्थिरावला होता.
फॉरेक्स व्यापार्यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटींना गती मिळण्याची शक्यता असल्याने रुपया सकारात्मकतेने उघडला. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्यापार हा चर्चेचा प्रमुख विषय होता आणि दोन्ही नेत्यांनी त्यांच्या वाटाघाटीकारांना प्रस्तावित व्यापार कराराला लवकरात लवकर अंतिम रूप देण्याचे निर्देश दिले आहेत.
तथापि, अमेरिका-इराण शांतता कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे बाजारातील भावना कमकुवत झाल्या, असे व्यापार्यांनी सांगितले. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी इराणी वाटाघाटीकारांशी चर्चा करण्यासाठी स्वित्झर्लंडचा आपला दौरा पुढे ढकलला असून, व्हाईट हाऊसने लॉजिस्टिकल समस्यांचे कारण दिले आहे. एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी निव्वळ आधारावर 1,025.20 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केली.





