Uttam Jankar : “ससा धरुन खाणारी माणसं”; मंत्री जयकुमार गोरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उत्तम जानकरांचे वादग्रस्त विधान

Uttam Jankar : माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वन्यजीव प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जानकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. पूर्वी आमचे लोक वाघाची शिकार करायचे, आता ससा खाऊन पोट भरतात, असं वादग्रस्त विधान उत्तम जानकर यांनी केल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे आता जानकर यांच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा सुरु आहे.
नीरा देवघर धरणातून पाणी मिळावे या मागणीसाठी जानकर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन झाले होते. आंदोलनानंतर झालेल्या मटण पार्टीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्यत्तर देताना उत्तम जानकर यांनी वादग्रस्त केलं आहे. वडापाव, केळी खाऊन लोक कंटाळले आहेत. डोंगरदऱ्यातील लोकांनी बोकड किंवा ससा खाल्ला तर त्यात चूक काय? असं देखील जानकर म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.
उत्तम जानकर नेमकं काय म्हणाले?
या भागातील लोक ऐतिहासिक लढायांमध्ये सहभागी झाले होते. पूर्वी ते वाघाची शिकार करायचे, आज दुष्काळाशी लढा देत आहेत. जर सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवला, तर लोकांना मटण खावे लागणार नाही. तेव्हा ते पुन्हा वडापाव, भोपळा, केळीवर समाधान मानतील, असं जानकर म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले, पूर्वी आमची लोकं वाघाची शिकार करायची. आता ताणून ससा धरुन खाणारी माणसं आहेत. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे त्यांनी केलेल्या या टीकेला मंत्री जयकुमार गोरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान ; NDA च्या बाजूने नंबर गेम, इंडिया आघाडीला क्रॉस व्होटिंगची आशा





