“उत्तर प्रदेश, बिहारचे लोक म्हणू नये इथे महाराष्ट्रासारखी…”; लातूरच्या घटनेवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

Rohini Khadse | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्यासा ठी सध्या मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात भेटी देत आहेत. काल लातूर येथे पत्रकार बैठकीनंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना निवेदन दिले.
मात्र, निवेदन देऊन झाल्यानंतर त्यांनी पत्तेही उधळले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाली. आता या घटनेचे राजकीय पडसाद उमटत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाष्य केले.
रोहिणी खडसे पोस्ट –
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची कल्पना करता येत नाही… लातूर येथील विश्रामगृहात खा.सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचारला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखवल्या तर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. Rohini Khadse |
महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही…
लातूर येथील विश्रामगृहात खा. @SunilTatkare यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचारला. यावेळी या… pic.twitter.com/vRQCDlRCpq
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 20, 2025
असे प्रकार महाराष्ट्रात कधीच पहायला मिळायचे नाहीत.. Tom, Dick, Harry च्या कृपेमुळे महाराष्ट्रात आता हे सगळं घडत आहे. मला भीती आहे की उद्या उत्तर प्रदेश, बिहारचे लोक म्हणू नये की आमच्या इथे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको !” असे रोहिणी खडसे यांनी नमूद केले. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. Rohini Khadse |
हेही वाचा:
शिरूरमध्ये पावात आढळली घुशीची लेंडी; नागरिकांचा संताप, प्रशासनावर टीकेची झोड!





