\n

पंजाबकडून सर्वाधिक धावा प्रभसिमरन सिंगने केल्या, ज्याने 23 चेंडूत 30 धावा केल्या आणि आपल्या डावात 2 चौकार आणि 2 षटकारही लगावले. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात जॉनी बेअरस्टो, रिले रौसो आणि सॅम करनही फलंदाजीत अपयशी ठरले. आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जचा नायक शशांक सिंगने 20 चेंडूत 27 धावा केल्या, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

\n

168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 2 गडी गमावून 47 धावा केल्या होत्या. शशांक सिंग आणि प्रभासिमरन यांच्या 51 धावांच्या भागीदारीमुळे संघाने सामन्यात पुनरागमन केले. पण 8व्या षटकात शशांक 27 धावा करून बाद झाला आणि इथून विकेट्सची अशी घसरण सुरू झाली की पंजाब किंग्जने अवघ्या 16 धावांत 5 विकेट गमावल्या.

\n

यासह 13 षटकांत संघाची धावसंख्या 7 गडी गमावून 79 धावा झाली होती. 15व्या षटकात हर्षल पटेलही 12 धावा काढून बाद झाला, त्यामुळे पंजाबने 15 षटकात 91 धावा केल्या होत्या. त्यांना अजूनही 5 षटकात 77 धावांची गरज होती. 19व्या षटकात राहुल चहर 16 धावा काढून बाद झाला, त्यामुळे पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटच्या 2 षटकात पंजाबला विजयासाठी 47 धावा हव्या होत्या, पण फक्त 1 विकेट शिल्लक होती. सीएसकेचे गोलंदाज पंजाबला ऑलआउट करू शकले नसले तरी पीबीकेएसला निर्धारित 20 षटकांत केवळ 139 धावा करता आल्या.

\n

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिराना, दीपक चहर आणि मुस्तफिजुर रहमान खेळत नव्हते. असे असूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजाने संघाकडून सर्वाधिक विकेट घेतल्या, त्याने 4 षटकात 20 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. तुषार देशपांडेने 2 बळी घेतले, पण सिमरनजीत सिंगने सर्वाधिक प्रभावित केले. आयपीएल 2024 मध्ये पहिला सामना खेळताना तो 2 विकेट घेण्यात यशस्वी ठरला. मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेत चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

\n

IPL 2024 (PBKS vs CSK Match 53) : पटेल अन् चहरचा कहर, पंजाबच्या गोलंदाजांनी चेन्नईला 167 धावांवर रोखलं…

\n

\n

तत्पूर्वी, या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही.  अजिंक्य रहाणे 7 चेंडूत 9 धावा करून माघारी परतला. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या केवळ 12 होती. मात्र, यानंतर रुतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांच्यात चांगली भागीदारी झाली. रुतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांनी 57 धावा जोडल्या. मात्र ऋतुराज गायकवाड 32 धावा करून राहुल चहरच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर 19 चेंडूत 30 धावा काढून डेरिल मिशेल हर्षल पटेलचा बळी ठरला.

\n

एकवेळ चेन्नईची धावसंख्या एका विकेटवर 60 धावा होती, पण मधल्या षटकांमध्ये सतत विकेट पडल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एकवेळ चेन्नईची धावसंख्या आठव्या षटकात 2 विकेटवर 69 धावा होती. यानंतर संघाने 98 धावा करताना उर्वरित 7 विकेट गमावल्या. टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या शिवम दुबेला सलग दुसऱ्या सामन्यात खातेही उघडता आले नाही. डावातील पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीही डावातील पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.

\n

चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 26 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 21 चेंडूत 32 आणि डॅरिल मिशेलने 19 चेंडूत 30 धावा केल्या. रहाणे 9 धावा केल्यानंतर, मोईन अली 17 धावा केल्यानंतर, मिचेल सँटनर 11 धावा केल्यानंतर, शार्दुल ठाकूर 17 धावा करून बाद झाला.

\n

IPL 2024 (RCB vs GT Match 52) : किंग कोहलीचा आणखी एक मोठा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू…

\n

\n

पंजाब किंग्जकडून राहुल चहर आणि हर्ष पटेल यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. राहुलने 4 षटकात 23 तर हर्ष पटेल याने 4 षटकात 24 धावा दिल्या. अर्शदीप सिंगने 4 षटकात 42 धावा देत 2 बळी घेतले तर सॅम करनने 4 षटकात 34  धावा देत 1 यश मिळवले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IPL 2024 (PBKS vs CSK Match 53) : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईविरूध्द पंजाबचा दारूण पराभव…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/csk-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pbks-vs-csk-highlights-chennais-sixth-win-defeated-punjab-by-28-runs-in-dharamshala-jadejas-all-round-performance#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/csk-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/pbks-vs-csk-highlights-chennais-sixth-win-defeated-punjab-by-28-runs-in-dharamshala-jadejas-all-round-performance#webpage","name":"IPL 2024 (PBKS vs CSK Match 53) : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईविरूध्द पंजाबचा दारूण पराभव…","url":"https://www.dainikprabhat.com/pbks-vs-csk-highlights-chennais-sixth-win-defeated-punjab-by-28-runs-in-dharamshala-jadejas-all-round-performance","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pbks-vs-csk-highlights-chennais-sixth-win-defeated-punjab-by-28-runs-in-dharamshala-jadejas-all-round-performance#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/csk-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/pbks-vs-csk-highlights-chennais-sixth-win-defeated-punjab-by-28-runs-in-dharamshala-jadejas-all-round-performance#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/pbks-vs-csk-highlights-chennais-sixth-win-defeated-punjab-by-28-runs-in-dharamshala-jadejas-all-round-performance","name":"IPL 2024 (PBKS vs CSK Match 53) : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईविरूध्द पंजाबचा दारूण पराभव…"}}]}}}

IPL 2024 (PBKS vs CSK Match 53) : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईविरूध्द पंजाबचा दारूण पराभव…