Paud Panchayat Samiti : कोमल वाशिवले यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Paud Panchayat Samiti : गेल्या नऊ वर्षांच्या कामाची शिदोरी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार; कोमल वाशिवले निवडणूक मैदानात सज्ज.

Paud Panchayat Samiti – पौड पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार कोमल गणेश वाशिवले या महिला सक्षमीकरणाचा ठोस आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून पुढे येत असून, महिलांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला बचत गटांना स्वावलंबी बनवणे हा त्यांचा मुख्य अजेंडा असून, त्या निर्धाराने निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.
गेल्या नऊ वर्षांपासून कोमल वाशिवले यांनी पौड गणातील महिलांच्या प्रश्नांना सातत्याने प्राधान्य दिले आहे. महिला बचत गटांना प्रशिक्षण, बँक कर्ज व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला. या प्रयत्नांमुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून,
कुटुंबातील निर्णय प्रक्रियेतही त्यांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे.आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा तसेच महिलांच्या दैनंदिन अडचणी या विषयांवर कोमल वाशिवले कायम महिलांच्या सोबत उभ्या राहिल्या. घराघरांत जाऊन संवाद साधणे, महिलांचे प्रश्न आपुलकीने ऐकून घेणे आणि त्यावर तत्काळ मार्ग काढणे ही त्यांची कार्यपद्धती महिलांना भावत आहे.
त्यांच्या कार्यशैलीमुळे पौड गणातील महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, आपली माणूस म्हणून त्या महिलांच्या पसंतीस उतरल्या आहेत. महिला बचत गट, महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणींचा वाढता पाठिंबा हीच त्यांची मोठी ताकद ठरत आहे.
आगामी निवडणुकीत महिलांचा हा एकसंघ पाठिंबा कोमल वाशिवले यांची उमेदवारी निर्णायक ठरेल, अशी चर्चा सध्या पौड गणात जोर धरू लागली असून, महिला मतदारच विजयाचा कणा ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.




