ससून रुग्णालयाच्या गच्चीवरुन उड्डी मारुन रुग्णाची आत्महत्या
Updated On:

Sassoon Hospital | शुक्रवार दि. ४ मार्च रोजी ससून रुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन एक रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दशरश सुरेश मेढे वय (वय ३१, रा. राजूर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
मेढे याला दारुचे व्यसने आहे. गुरुवारी रात्री त्याला त्याने दारु प्यायल्यानंतर कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली. तो अस्वस्थ झाल्याने त्याला कुटुंबीयांनी ससूनमध्ये दाखल केले. त्याच्यावर वार्ड क्रमांक ४० मध्ये उपचार घेत होता. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याने रुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.





