Pat Cummins : पॅट कमिन्सने रचला नवा इतिहास, रिची बेनॉडचा मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम

Pat Cummins Breaks 63 Year Old Record : ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात पॅट कमिन्सने नवा इतिहास रचला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी कोणीही करू न शकलेला पराक्रम, त्यानी करून दाखवला आहे. पॅट कमिन्सने तब्बल ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. आता त्याचे लक्ष पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानच्या जागतिक विक्रमावर आहे.
पॅट कमिन्सने मोडला बेनॉडचा ६३ वर्षांचा विक्रम –
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने वेस्टइंडीजविरुद्ध पहिल्या डावात दोन विकेट्स घेतल्या. यासह, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू बनण्याचा मान त्याने मिळवला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिची बेनॉडच्या नावावर होता. पॅट कमिन्सने बेनॉडचा सुमारे ६३ वर्षांचा विक्रम मोडला. वेस्टइंडीजच्या रोस्टन चेसला बाद करताच कमिन्सने हा विक्रम आपल्या नावावर केला. आता पॅट कमिन्सने कर्णधार म्हणून १३९ विकेट्स घेतल्या असून, हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आहे.
आता इम्रान खानच्या विक्रमावर कमिन्सचा डोळा –
Pat Cummins goes past Richie Benaud in taking the most Test wickets as a captain 👏#PatCummins #WIvAUS #CricketTwitter pic.twitter.com/22UqxcYhZ5
— InsideSport (@InsideSportIND) June 27, 2025
जगभरातील कर्णधारांचा विचार केला तर कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज इम्रान खान आहे. १९९२ मध्ये पाकिस्तानसाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा कर्णधार इम्रान खानने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये १८७ विकेट्स घेतल्या आहेत. हे खरे आहे की सध्या पॅट कमिन्स इम्रान खानपासून खूप मागे आहे, पण पॅटला हे अंतर कमी करण्यास जास्त वेळ लागणार नाही. आता या कसोटी सामन्यात जेव्हा वेस्टइंडीजचा संघ फलंदाजीसाठी उतरेल, तेव्हा पॅटला आणखी काही विकेट्स घेण्याची संधी असणार आहे.
हेही वाचा – Shikhar Dhawan : धवन गर्लफ्रेंडला रोहितसोबतच्या रुममध्ये कसा आणायचा? स्वत:च केला खुलासा
ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंची यादी :
पॅट कमिन्स: १३९ विकेट्स
रिची बेनॉड: १३८ विकेट्स
बॉब सिम्पसन: ४१ विकेट्स
इयान जॉनसन: ३९ विकेट्स
मॉन्टी नोबल: ३१ विकेट्स





